Advertisement

एबी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती

२०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाआधी एबी डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. आयपीएलमध्ये डिव्हिलियर्स राॅयल चॅलेंजर्स आॅफ बंगळुरू या संघाकडून खेळत होता.

एबी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती
SHARES

दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबंद फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी एबी डिव्हिलियर्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत हा निर्णय जाहीर केला. फाॅर्मात असलेल्या डिव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.


काय म्हटलं 'एबीडी'ने?

'मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. माझा डाव संपला आणि इमानदारीने सांगायचं तर मी थकलो आहे. हा खूप कठिण निर्णय होता, हा निर्णय घेण्यासाठी मी खूप वेळ या निर्णयावर विचार केला आणि आता रिटायरमेंट घ्यायची आहे.', असं ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एबी डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.


 

दक्षिण आफ्रिकेला झटका

२०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाआधी एबी डी. व्हिलियर्सने अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. आयपीएलमध्ये डिव्हिलियर्स राॅयल चॅलेंजर्स आॅफ बंगळुरू या संघाकडून खेळत होता.


किक्रेट कारकिर्द

एबी डिव्हिलियर्सने १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये ११४ कसोटी सामन्यांमध्ये ५०.६६ च्या सरासरीने २२ शतकांसह ८७६५ धावा केल्या आहेत. तसंच २२० एकदिवसीय सामन्यांत ५३.५ च्या सरासरीने त्याने ९५७७ धावा केल्या आहेत, तर ७८ टी-२० सामन्यात १० अर्ध शतकांसह १६७२ धावा केल्या आहेत.



हेही वाचा-

चेन्नईकडून हैदराबादचा ‘सूर्यास्त’, सातव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा