दिव्या चितळेची आयटीटीएफ प्रशिक्षण शिबिरात निवड

  Mumbai
  दिव्या चितळेची आयटीटीएफ प्रशिक्षण शिबिरात निवड
  मुंबई  -  

  टेबल टेनिसच्या सब ज्युनियरशीपमध्ये नॅशनल चॅम्पियन ठरलेल्या मुंबईच्या दिव्या चितळे हिची आयटीटीएफ रफ डायमंडस प्रशिक्षण शिबिरात निवड करण्यात आली आहे. 10 मुलं आणि 10 मुलींमध्ये दिव्या चितळे ही एकटीच भारतीय आहे. हे शिबीर 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. स्लोव्हेनियन टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने आयटीटीएफ एज्युकेशन आणि ट्रेनिंग प्रोग्रॅमद्वारे 'रफ डायमंडस' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जोसे उह (एसएलओ) आणि आंद्रेजा ओजेस्टेक उर (एसएलओ) हे प्रमुख प्रशिक्षक असतील. तर त्यांच्या हाताखाली अजून दोन प्रशिक्षक देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेल्या तरुण खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि सुविधा देण्याचा प्रमुख अजेंडा या प्रशिक्षणाचा असणार आहे. यामध्ये विशेषत: खेळाडूंच्या गरजांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.