मुंबई एफसीसाठी 'करो वा मरो'ची स्थिती

 Churchgate
मुंबई एफसीसाठी 'करो वा मरो'ची स्थिती

कुपरेज - फुटबॉलट आय लीगमध्ये मुंबई एफसी विरूद्ध मोहन बगान असा सामना होणार आहे. या लीगमध्ये मुंबईने सुरुवात चांगली केली असली तरी त्यांना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. सामन्यापूर्वी मुंबईचे प्रशिक्षक कश्यप म्हणाले की 'कमी बजेट आणि चांगल्या खेळाडूंच्या अाभावामुळे संघ प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. तसंच दुखापतीमुळे या सामन्यात स्टिव्हन डिआज आणि विक्टोरिनो फर्नांडेस खेळू शकले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

पण आता पुढचा सामना रविवारी होणार आहे. यामध्ये मुंबई आणि बंगळुरू एफसीमध्ये लढत होणार आहे. मुंबईला आय लीगमध्ये टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल.

Loading Comments