Advertisement

पालकमंत्री चषक स्पर्धेत एकनाथ शिंदे सीसीची बाजी


पालकमंत्री चषक स्पर्धेत एकनाथ शिंदे सीसीची बाजी
SHARES

ठाणे येथील दादोजी कोंडदेव येथे झालेल्या पालकमंत्री चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने बाजी मारून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने इएससीसी-टू संघाचा 22 धावांनी पराभव केला. एम.गुप्ता (36 चेंडूत 58 धावा), विद्याधर कामत (15 चेंडूत 27 धावा) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज विनायक भोईर (22 धावांत 3 बळी), शशिकांत कदम (38 धावांत 2 बळी) हे आजच्या सामन्याचे खरे हिरो ठरले. तर दुसरीकडे आशय सरदेसाईने शानदार नाबाद अर्धशतक करुनही इएससीसी-टू संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

विरुद्ध संघातील गोलंदाज अतुलसिंग याने (43-3), जयेश पाटील (32-2) तर डावखुरा फिरकी गोलंदाज हेमंत बुचडे (23-2) यांनी विकेट घेऊन देखीलही एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने 20 षटकांत 9 बाद 170 धावा केल्या. सलामीवीर एम.गुप्ताने धडाकेबाज अर्धशतक झळकावून विद्याधर कामत सोबत चौथ्या विकेटसाठी 35 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर अरुण यादव (21 धावा) आणि स्वप्नील साळवी (25 धावा) यांनी इएससीसी-टू संघाला 44 धावांची सलामी भागीदारी करून दिली. त्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज विनायक भोईर आणि शशिकांत कदम यांनी अखेर इएससीसी-टू संघाचा डाव 148 धावांमध्ये संपवला. तर आशय सरदेसाईने (38 चेंडूत नाबाद 51 धावा) एका बाजूने शेवटपर्यंत संयमी फलंदाजी करूनही त्याला एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा 22 धावांचा विजय रोखता आला नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा