'एलफिन्स्टन सीसी'चा 'दैवज्ञ'वर दणदणीत विजय

  Mumbai
  'एलफिन्स्टन सीसी'चा 'दैवज्ञ'वर दणदणीत विजय
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई क्रिकेट असोशिएशनतर्फे भरवण्यात आलेल्या समर व्हेकेशन शिल्डमध्ये एलफिन्स्टन सीसीने दैवज्ञ क्रिकट क्लबचा पराभव केला. नाणेफेक जिंकून एलफिन्स्टन सीसीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलफिन्स्टन सीसीने 38 ओव्हरमध्ये सर्वबाद 146 धावा केल्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना दैवज्ञ क्रिकट क्लबचा संघ अवघ्या 100 धावांत गडगडला. एलफिन्स्टन सीसीचा कर्णधार वासिम अन्सारी याने सात ओव्हरमध्ये 15 रन्स देत 3 विकेट घेतले. तर जय रिझवान आणि साजिदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या विजयामुळे एलफिन्स्टन सीसीने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. यंदाच्या सीजनमध्ये झालेल्या लिबरल कप स्पर्धेत एलफिन्स्टन सीसीला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता एलफिन्स्टन सीसीच्या पुढील कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.