Advertisement

गॅरी कर्स्टन यांचे खेळाडूंना मार्गदर्शन


गॅरी कर्स्टन यांचे खेळाडूंना मार्गदर्शन
SHARES

मरीन ड्राईव्ह - सालढाणा आंतरराष्ट्रीय अकादमीच्या वतीनं 5 दिवसीय क्रिकेट प्रशिक्षणाचं आयोजन मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर करण्यात आलंय. 5 नोव्हेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. यात मुंबईतून 14 ते 16 वयोगटातल्या 44 मुला-मुलींनी सहभाग घेतलाय. या प्रशिक्षणाचं आयोजन अकादमीचे अध्यक्ष कॅप्टन ऑल्विन सालढाणा यांनी केलंय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साउथ आफ्रिकेचे माजी क्रिकेटर गॅरी कर्स्टन उपस्थित होते. या वेळी कर्स्टन यांनी मुलांना बॅटिंग,बॉलिंग, फिल्डिंग बद्दल प्रशिक्षण दिलं. तसंच कोणताही खेळ खेळताना संघभावना गरजेची असते, असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला गॅरी कर्स्टन, रयान कुक, ऑल्विन सालढाणा आणि डॅरॉन सालढाणाही उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा