• जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुलींचा विजय
  • जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुलींचा विजय
SHARE

मरोळ - गुंदवली पालिका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पूजा विल्सन मसी आणि किरण प्रदिप जैसवाल या मुलींनी उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय. बुधवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईतील अनेक विभागातून तसंच रायगड, पालघर, डहाणू जिल्ह्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. पूजा १ वर्षांपासुन कुस्ती खेळते आहे, तर किरणनेही ४ महिन्यांपासून कुस्ती खेळाचं प्रशिक्षण सुरू केलंय. खेळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल मार्गदर्शक गुरू उमेश वोरा यांनी या मुलींचं भरभरून कौतुक केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या