'हरित मुंबई स्वच्छ मुंबई'साठी आठवले धावले

 Mumbai

See all

नरिमन पॉईंट - शासकीय विधी महाविद्यालय चर्चगेट यांच्यावतीने नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत साडेचार किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन दौड स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,भाजपा प्रवक्त्या शायना एन सी यांच्या हस्ते रविवारी झाले.
सदर स्पर्धा हरित मुंबई, स्वच्छ मुंबई या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय नाथानी यांच्यासह रिपाई (आ)विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे,नितीन माने,सुनील बुद्धवंत दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सो. ना. कांबळे, मुंबई उपाध्यक्ष रवी तांबे यांच्यासह शासकीय विधी महाविद्यालय,एल्फिस्टन महाविद्यालय,सिडनहॅम महाविद्यालय आणि एम के एस महाविद्यालययातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Loading Comments