Advertisement

हिंद करंडक स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद


हिंद करंडक स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद
SHARES

वडाळा - आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भारतीय क्रीडा मंदिरात शुक्रवारी झाला. हिंद करंडक स्पर्धेत 55 शाळांनी सहभाग घेतला होता. लंगडीमध्ये (मुले) प्रथम पारितोषिक डॉ. त्रि. रा. नरवणे विद्यालय (कांदिवली) तर मुलींच्या संघात महात्मा गांधी विद्यामंदिर (वांद्रे) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच खो-खो मध्ये मुले/मुली या दोन्ही संघातील रा.फ.नाईक विद्यालय (कोपरखैरण) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. त्याचबरोबर प्रो-कबड्डी (मुले) शारदाआश्रम विद्यामंदिर (दादर) आणि मुलींमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर (वांद्रे) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेतील महत्वाची चांदीची ट्रॉफी 'टोपीवाला हिंद करंडक' रा.फ.नाईक (नवी मुंबई) आणि 'राणी लक्ष्मीबाई हिंद करंडक' महात्मा गांधी विद्यामंदिर (वांद्रे) या शाळांना मिळाली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा