Advertisement

वडाळ्यात आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धेचे आयोजन


वडाळ्यात आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धेचे आयोजन
SHARES

वडाळा - भारतीय क्रीडा मंदिरात आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. 13 जानेवारीपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, लंगडी असे तीनही प्रकारचे खेळ खेळले जाणार आहेत. यामध्ये 35 पेक्षा अधिक शाळांचा सहभाग आहे. तर, एकूण 15 हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

मुलांना देण्यात येणाऱ्या चषकाला 'टोपीवाला हिंद करंडक' तर मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई हिंद करंडक' असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक खेळातील उत्कृष्ट खेळाडूला रोख 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. 13 जानेवारीला या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. "गेली 74 वर्ष या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद असतो, असे हिंद करंडक स्पर्धा समितीचे समन्वयक डॉ. घ. का. ढोकरट यांनी सांगितले.

या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय बाबुराव शेटे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयडियल स्पोर्ट्स अकादमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, प्रो-कबड्डी खेळाडू रिशांत देवाडिगा, खो-खोमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेती वैषाली लोंढे आणि जिम्नॅस्टिक अक्षता शेटे उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा