बॉम्बे रिपब्लिकनने इंडियन नेव्हीला रोखले

 Churchgate
बॉम्बे रिपब्लिकनने इंडियन नेव्हीला रोखले

चर्चगेट - हॉकी लीगमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या इंडियन नेव्ही संघाविरुद्ध बॉम्बे रिपब्लिकन संघाने सामना ३-३ अशा बरोबरीत रोखला. विश्रांतीनंतर आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत इंडियन नेव्ही संघाने सामन्यात बरोबरी मिळवली. परिणामी लीगमध्ये बॉम्बे संघाने पहिल्याच सामन्यात एक गुणासह खाते उघडले असून, नेव्ही संघ दोन सामन्यात चार गुणांची कमाई करत आघाडीवर होता.

अन्य लढतीत, गतविजेत्या पश्चिम रेल्वे विरुद्ध युनियन बँक आॅफ इंडियन संघाचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्यात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळाचा पवित्रा स्वीकारल्याने उभय संघाच्या एकाही खेळाडूला गोल नोंदवता आला नाही.

Loading Comments