स्पेशल ऑलिम्पिक 'वर्ल्ड विंटर'चे रिअल हिरो

 Mumbai
स्पेशल ऑलिम्पिक 'वर्ल्ड विंटर'चे रिअल हिरो
स्पेशल ऑलिम्पिक 'वर्ल्ड विंटर'चे रिअल हिरो
स्पेशल ऑलिम्पिक 'वर्ल्ड विंटर'चे रिअल हिरो
See all

अंधेरी - ऑस्ट्रिया देशात झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. मात्र यामध्ये महाराष्ट्रतील या मुलांची कामगिरी भरीव होती. विजयी पताका उभारणाऱ्या स्पेशल मुलांच्या या टीमचे मंगळवारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत एकच जल्लोष केला. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा यंदा युरोप खंडातील ऑस्ट्रिया देशाच्या ग्रात्स या शहरात झाली. 14 ते 25 मार्चपर्यंत झालेल्या या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. भारताच्या युवकांच्या संघाने फ्लोअर हॉकी या स्पर्धेत स्पेन विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून सुवर्ण पदक पटकावले. या संघात मुंबई, लातूर, पुणे, जळगाव आदी भागातील मुलांचा समावेश होता.

आपल्या दिव्यांगावर मात करून भारताचा अटेकपार झेंडा रोवत मेडलची कमाई करणाऱ्या या रिअल हिरोंचं कौतुक करावे तेवढंच थोडं. मात्र यापुढेही भारताला अशीच मेडलची कमाई करून देवो यासाठी त्यांना मुंबई लाइव्हच्या शुभेच्छा.

Loading Comments