Advertisement

मुंबईच्या अभिषेक प्रधानची उपांत्य फेरीत धडक


मुंबईच्या अभिषेक प्रधानची उपांत्य फेरीत धडक
SHARES

बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या 42 व्या महाराष्ट्र राज्य ओपन स्क्वॅश टुर्नामेंटमध्ये पुरुष गटात मुंबईच्या अभिषेक प्रधान याने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याने अव्वल मानांकित असलेल्या इंग्लडच्या रॉबर्ट डाउनर याला उप-उपांत्य फेरीत 11-5, 11-13, 11-1, 10-12, 11-4 अशा फरकाने नमवत आपला विजय साकारला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ही स्पर्धा शनिवारी फोर्टच्या बॉम्बे जिमखाना येथे रंगली.

24 वर्षीय अभिषेकने जबरदस्त खेळी करत जगात 207 व्या क्रमांकावर असलेल्या इंग्लडच्या रॉबर्टला चांगलेच दबावाखाली आणले आणि हा सामना आपल्या खिशात घातला. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. रॉबर्टसारख्या अनुभवी खेळाडूचा पराभव केल्याने प्रधानवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

यादरम्यान झालेल्या आणखी एका सामन्यात महाराष्ट्राचा दुसरा मानांकित असलेला अदित्य जगताप याने देखील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गोव्याच्या यश फाडते याला सरळ सेटमध्ये 11-7, 11-5, 11-2 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

याव्यतिरिक्त झालेल्या इतर सामन्यात संदीप जांग्राने अभिषेक अग्रवालचा 7-11, 11-6, 11-9, 11-8 अशा गुण संख्येने पराभव केला.



हेही वाचा - 

स्क्वॅश टुर्नांमेंटमध्ये महाराष्ट्राच्या रेवा भार्माचा पराभव


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा