Advertisement

स्क्वॅश टुर्नांमेंटमध्ये महाराष्ट्राच्या रेवा भार्माचा पराभव


स्क्वॅश टुर्नांमेंटमध्ये महाराष्ट्राच्या रेवा भार्माचा पराभव
SHARES

42 व्या महाराष्ट्र राज्य ओपन स्क्वॅश टुर्नांमेंटमध्ये महिला गटात महाराष्ट्राच्या रेवा भार्मा हीला सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. बॉम्बे जिखान्यातर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शुक्रवारी फोर्ट येथील बॉम्बे जिमखान्याच्या ब्लॅक ग्लास कोर्टवर खेळवण्यात आली. या स्पर्धेत अव्वल मानांकित असलेल्या दिल्लीच्या सचिका इंगळेने उप-उपांत्य फेरीत विजय मिळवला.

सचिकाने 15 वर्षीय रेवाला सुरुवातीलाच पूर्णपणे दबावात आणले आणि 13-3, 11-5, 11-1 अशा गुण संख्येने मात करत आपले वर्चस्व राखत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

इतर लढत महाराष्ट्राच्या प्रांजली शर्मा विरुद्ध अमेरिकेच्या मिरा कामत यांच्यात झाली. यामध्ये प्रांजलीने शानदार खेळ करत मिराला 13-15, 11-6, 7-11, 11-7, 11-5 अशा गुण संख्येने मात देत विजय साकारला.

दुसऱ्या एका सामन्यात महाराष्ट्राच्या 15 वर्षांच्या साराह वाटेकरने तीन गुणांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी असलेल्या तारिका वोहरा हिचा 11-0, 11-0, 11-3 अशा गुणसंख्येने पराभव केला.

पुरुष विभागात अव्वल आणि दुसरा मानांकित असलेला इंग्लडचा रॉबर्ट डाउनर आणि महाराष्ट्च्या अदित्य जगताप यांनी सरळ उप-उपांत्य फेरीत विजय मिळवला. रॉबर्टची लढत आशिष केसकरसोबत झाली. त्याने 11-5, 11-2, 11-2 अशा फरकाने विजय मिळवला तर आदित्यची लढत उत्तर प्रदेशच्या रणजीत सिंहसोबत झाली. त्याने 11-2, 11-4, 11-5 अशा गुण संख्येने नमवत विजय मिळवला.



हेही वाचा - 

बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा पराभव

फॅल्कन टीटीसी संघ ठरला टेबल टेनिस चॅम्पियन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा