Advertisement

फॅल्कन टीटीसी संघ ठरला टेबल टेनिस चॅम्पियन


फॅल्कन टीटीसी संघ ठरला टेबल टेनिस चॅम्पियन
SHARES

टेबल टेनिसच्या फ्रान्सिस स्पोर्टस् लीगमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात फॅल्कन्स टीटीसीने शेज चॅलेंजर्स संघाला 14-9 अशा फरकाने नमवत विजय मिळवला. सीएट अल्टिमेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेतील हा अंतिम सामना वरळीच्या एनएससीआय स्टेडियम येथे झाला. या स्पर्धेच्या नियमानुसार प्रथम नॉकआऊट 14 गुणांची आघाडी घेणारा संघ विजयी घोषित केला जातो. फॅल्कन्सच्या सानील शेट्टी, ली हू चींग यांनी शेज चॅलेंजर्सच्या सौम्यजीत घोष, पेट्रीसा सोलजा यांना 3-0 ने पराभवाची धूळ चारत 7-2 ची घाडी मिळवली.

महिला एकेरी गटात शेज चॅलेंजर्सच्या मौमा दासला फॅल्कन्स संघातील खेळाडू वू-यांग हीने 3-0 ने नमवत आपल्या संघाला 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. वू-यांग हीने सरळ तिन्ही सेटमध्ये एकहाती विजय मिळवत संघाचे वर्चस्व राखले. पुढे मिश्र दुहेरी भारतीय-विदेशी गटातही फॅल्कन्स संघाच्या खेळाडूंनी विजय मिळवून स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला.

या अंतिम सामन्यात विदेशी खेळाडूंनी देखील आपल्या चमकदार कमगिरीचे प्रदर्शन केले. विदेशी खेळाडूंच्या पुरूष एकेरी गटात शेज चॅलेंजर्सच्या एंड्रेज गसीना याने फॅल्कन्सच्या लीयम पीचफोर्डला 2-1 ने नमवत विजय आपल्या खिशात टाकला. यावेळी फॅल्कन्स टीटीसी 8-4 अशा फरकाने आघाडीवर होती. याच विदेशी खेळाडूंच्या महिला एकेरी गटात फॅल्कन्स टीटीसीच्या वु-यांग हीने टेबल टेनिसमध्ये जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर असलेल्या चायनाच्या अनुभवी हन यींग हीला सरळ तीन सेटमध्ये 3-0 ने मात देत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या अंतिम सामन्याला मुंबईकरांसह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, महाराष्ट्र जनरल डायरेक्टर सतीश माथूर, हॉकीपटू युवराज वाल्मिकी या दिग्गज मंडळींनी यावेळी उपस्थिती लावली.



हेही वाचा -

टोनी प्रिमियर लीगमध्ये फेअरमाऊंट फॅलकनचा विजय

'या' पालिका कर्मचाऱ्याची बातच काही और!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा