Advertisement

भारतात वाढतेय पिकलबॉलची क्रेझ


SHARES

भारतामध्ये जास्त करून क्रिकेट या खेळाबद्दल बोललं जातं किंवा याच खेळाचे जास्त गुणगाण गायले जातात. पण आता हळूहळू क्रिकेटसोबत बाकी खेळही नावारुपाला येत आहेत. त्यापैकी एक खेळ म्हणजे पिकलबॉल. 1965 मध्ये पिकलबॉल या खेळाची सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या एका खासदारानं या खेळाची सुरुवात केली होती आणि आज तोच खेळ जगात तब्बल 20 च्यावर देशात खेळला जात आहे. भारतात 2007 साली सुनील वालवलकर यांनी मुंबईतून या खेळाची सुरुवात केली. तेव्हा फक्त 10 खेळाडू होते. आता ती संख्या महाराष्ट्रात 700-800 वर गेली आहे. तसेच भारताने या खेळात आतंरराष्ट्रीय स्तरावर दोन वेळा सुवर्णपदकाची कमाई केली आहे. राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा चॅम्पियन झालेले खेळाडू पिकलबॉलमधून भारताला मिळाले. भारतामध्ये ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन म्हणजेच AIPA ही या खेळाची संघटना आहे. पिकलबॉल कधीही आणि कुठेही खेळला जातो.

मुंबईतील गोरेगावमधील मंगल कृपा सोसायटीत तर पिकलबॉल खेळण्यासाठी तेथील रहिवाशांनी स्वत: पिकलबॉलचे कोर्ट बनवलेले आहे. तरुणांमध्ये या खेळाबद्दल जागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा संघटनेतर्फे महाविद्यालय आणि शाळांमध्ये डेमो दिले जात आहेत. अधिक माहितीसाठी http://www.aipa.co.in/ या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता.

काय आहे पिकलबॉल?

टेबल टेनिसच्या पॅडलनं बॅडमिंटनच्या कोर्टवर लॉन टेनिसचा खेळ खेळणे म्हणजेच ‘पिकलबॉल’. हा खेळ बॅडमिंटन कोर्टच्या आकाराच्या कोर्टवर खेळला जातो. तर या खेळाची रचना लॉन टेनिसप्रमाणे आहे. हा खेळ टेबल टेनिससारख्या पॅडलनं खेळला जातो. तसंच प्लास्टिक चेंडूचा वापर होत असल्यानं येथे फटका मारताना जास्त जोरही द्यावा लागत नाही.

गेल्या दहा वर्षांपासून भारतात हा खेळ खेळला जातो. या खेळाचा २०हून अधिक राज्यांमध्ये प्रसार झाला असून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा खेळ खेळला जातो. हा खेळ प्रामुख्याने तीन खेळांचे मिश्रण असून खेळण्यास अत्यंत सोपा, परंतु त्याहून अधिक आव्हानात्मक आहे. लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या तीन खेळांच्या मिश्रणातून बनलेल्या या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळाला कोणतीही वयोमर्यादा नाही. अगदी ४-५ वर्षांच्या चिमुरड्यांपासून ६५-७० वर्षांपलीकडचे उत्साही तरुणही हा खेळ खेळू शकतात!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा