पोद्दार कॉलेजमध्ये 'बोल्डरिंग'चा थरार

    मुंबई  -  

    माटुंगा - इंडियन ओपन बोल्डरिंग चॅम्पियनशिप रविवारी आर ए पोद्दार महाविद्यालयात पार पडली. मुंबईतील सर्वात जुना गिर्यारोहक क्लब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गिरीविहार'तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बाउल्डरिंग रॉक हा गिर्यारोहणाचा एक प्रकार आहे. यामध्ये गिर्यारोहक दगडांवर चढतात किंवा 20 फूट अंतरापेक्षा कमी उंचीच्या खडकांवर चढतात. यात पुरुषांमध्ये नवी दिल्लीच्या आदर्श सिंगने तर महिलांमध्ये मुंबईच्या सिद्धी मानेरिकरने प्रथम क्रमांक पटकावला. 2020 मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये गिर्यारोहक चॅम्पियनशिपही होणार आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.