'सहा' चा नवा विक्रम


  • 'सहा' चा नवा विक्रम
SHARE

धर्मशाला - चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात सहाने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मोडत एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवलेला आहे. कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतलेल्या धोनीनंतर विकेट किपर म्हणून रिध्दीमान सहा हा सध्या विकेट किपिंग करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 2016-17 मध्ये सहाने 26 जणांना माघारी धाडत धोनीला मागे टाकले आहे. असाच विक्रम धोनीने 2012-13 मध्ये देखील केला होता. धोनीने 24 जणांना माघारी धाडले होते. या यादीत सय्यद किरमानी यांचा अव्वल क्रमांक लागतो. त्यांनी 1979-80 या मोसमात 35 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या