विजयासाठी भारतीय फुटबॉल टीम सज्ज

Andheri west
विजयासाठी भारतीय फुटबॉल टीम सज्ज
विजयासाठी भारतीय फुटबॉल टीम सज्ज
विजयासाठी भारतीय फुटबॉल टीम सज्ज
See all
मुंबई  -  

अंधेरी - भारतीय फूटबॉल टीम सध्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जोरदार सराव करताना दिसत आहे. येणाऱ्या आठवड्यात एएफसी कप क्लालिफायर्समध्ये 22 मार्चला कंबोडिया आणि 28 मार्चला म्यनमारसोबत भारतीय संघ खेळणार असल्याने भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफेन कोनस्टैनटिन यांनी 32 जणांची या सरावासाठी निवड केली आहे. 

कंबोडिया आणि मॅनमारचे वातावरण हे मुंबईच्या वातावरणाशी मिळते जुळते असल्याने भारतीय संघ मुंबईत सराव करत आहे. याच मैदानात मागच्या वेळी भारताने प्यूर्टो रिकोला 4-1 ने धूळ चारली होती. सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत असल्याचे कर्णधार फॉरवर्ड रोबिन सिंह याने सांगितले. तसेच येणाऱ्या सामन्यातही आम्ही चांगला खेळ करू असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.