Advertisement

गोल्डन टचवर आयएनजीने कोरले नाव


गोल्डन टचवर आयएनजीने कोरले नाव
SHARES

गोल्डन टच 16 वर्ष वयोगटातील फुटबॉलच्या अंतिम सामन्यात आयएनजी पार्टनर्सने बाजी मारली. दादरच्या हॉटफूट साऊथ युनायटेड मैदानावर मंगळवारी हा सामना रंगला. यामध्ये आयएनजी पार्टनर्सने लेहर फाऊंडेशनला जोरदार धडक देत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. या आधी झालेल्या उपांत्य फेरीत आयएनजी विरुद्ध आधार प्रतिष्ठानमध्ये झालेल्या लढतीत आयएनजीने आधार प्रतिष्ठानचा 6-1 ने धुव्वा उडवत अतिंम फेरीत प्रवेश केला. तसेच लेहर फाउंडेशन विरुद्ध जीत फांउडेशनमध्ये झालेल्या उपांत्य फेरीत लेहरने 7-6 ने विजय मिळवत जीत फांउडेेशनला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. यामध्ये सर्व संघ हे एनजीओचे संघ होते. त्यांच्यासाठी हे सामने भरवण्यात आले होते.

या सामन्यात उत्कृष्ट गोल स्कोरर म्हणून लेहर फाउंडेशनच्या श्रीकांत राठोड याला गोल्डन बुटचा पुरस्कार मिळाला. त्याने 8 गोल करत पुरस्कारावर आपले नाव कोरले. तसेच लेहर फाऊंडेशनच्या रितिक राठोडला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. गोल्डन टच फुटबॉल स्पर्धेत एकूण 8 संघ खेळवण्यात आले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा