एमडी कॉलेजचा बेसबॉल सराव

 Shivaji Park
एमडी कॉलेजचा बेसबॉल सराव

शिवाजी पार्क - इंटरकॉलेज बेसबॉल स्पर्धेसाठी परळच्या महर्षी दयानंद (एमडी) कॉलेजचे विद्यार्थी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर बेसबॉलचा जोरदार सराव करत आहेत. 18 ते 21 या वयोगटातील विद्यार्थ्यांचा या संघात समावेश आहे. बेसबॉलच्या संघात 16 खेळाडू असतात. त्यापैकी 9 प्रत्यक्ष मैदानावर उतरतात तर बाकी राखीव असतात. 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पनवेलच्या सीकेटी कॉलेजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई शहर आणि उपनगरांतील 15 ते 16 महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयातून उत्कृष्ठ खेळाडूची निवड होईल. निवडलेले खेळाडू चंडिगडला मुंबई विद्यापीठाच्या संघातून खेळणार आहेत. नोव्हेंबरमध्ये बेसबॉलचे सामने संपताच सॉफ्ट बॉलचे सामने सुरू होतील अशी माहिती एमडी कॉलेजचे प्रशिक्षक केदार बिलवलकर यांनी दिली.

 

Loading Comments