बुधवारपासून सुरु होणार आयपीएलचं धुमशान!

 Mumbai
बुधवारपासून सुरु होणार आयपीएलचं धुमशान!

मुंबई - इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) 2017 च्या चषकाचं अनावरण बुधवारी हैदराबादमध्ये होणार आहे. दोन महिन्यापर्यंत चालणाऱ्या या आयपीएल महोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे.

यंदाच्या इंडियन प्रिमियर लीगचा उद्घाटन समारंभ आठ ठिकाणी होणार आहे. तर पुणे आणि हैदराबादमध्ये 6 एप्रिलला, इंदोर आणि बंगळुरूत 8 एप्रिलला, कोलकातामध्ये 13 एप्रिलला, नवी दिल्लीत 15 एप्रिलला इंडियन प्रिमियर लीगचं उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या उद्घाटनाच्या दरम्यान अभिनेत्री अॅमी जॅक्सन, अभिनेता टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत. तर बुधवारी हैदराबादमध्ये होणाऱ्या उद्घाटन समारंभादरम्यान सर्व संघांचे कर्णधार उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments