बॅडमिंटनपटू श्रीकांत किदम्बी आयटीएमचा ब्रॅंड अॅम्बेसिडर


SHARE

बॅडमिंटनमध्ये आपली कमाल दाखवणारा श्रीकांत किदम्बी आता खारघरच्या आयटीएम इन्स्टिट्यूटचा ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून ओळखला जाईल. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात आपल्या आवडत्या खेळांमध्ये करिअर करावे यासाठी हैदराबादमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीकांत किदम्बीही उपस्थित होता.

4 सुपर सिरिज राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बीने विजेतेपद पटकावली आहेत. आयटीएम लवकरच एक स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार आहे. तेव्हा किदम्बीसारख्या शानदार खेळाडूंचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा असल्याचे यावेळी आयटीएमचे संस्थापक डॉ. पी. व्ही. रमन्ना यांनी सांगितले.


विशेष म्हणजे बॅडमिंटनमधील रायझिंग स्टार एच. एस. प्रणॉय आयटीएमशी संलग्न झाला आहे. यावेळी किदम्बीने त्याच्या करिअरमधील रिओ ऑलिम्पिक्सची त्याच्या पराभवाची आठवणही बोलताना सांगितली.

आयटीएम सुरू करत असलेल्या स्पोर्ट्स अकादमीमध्ये जे खेळाडू प्रशिक्षण घेतील, त्यांना करिअर घडवण्यामध्ये मार्गदर्शन करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल असे एच. एस. प्रणॉय यांनी म्हटले. या कार्यक्रमावेळी बॅडमिंटन गुरू पुलेला गोपीचंद, श्रीकांत किदम्बी, एच. एस. प्रणॉय, डॉ. पी. व्ही. रमन्ना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय