जेएसओ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालाड- जैन सोशल ऑरगनायझेशन (जेएसओ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली जेएसओ मॅरेथॉन रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. मालाड पश्चिमेकडील बॅकरोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये रविवार असूनही शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
'हेल्थीयर टुमारो' हे ब्रीदवाक्य असलेल्या जेएसओ मॅरेथॉनमध्ये लहान मुले,तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि दोन दिव्यांग व्यक्तींनी देखील सहभाग घेतला होता. वरिष्ठांसाठी 1 किमी, इतरांसाठी 3 किमी आणि 6 किमी धावण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीला मुंबईतून जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. यावेळी जेएसओ मॅरेथॉनचे आयोजक सुभाष वाडला जैन, सचिव सुरेंद्र बोहरा जैन, मुकेश कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments