जतीन परांजपे निवड समितीत

 Churchgate
जतीन परांजपे निवड समितीत
Churchgate, Mumbai  -  

मुंबई - माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईत सुरू झालेल्या बीसीसीआयच्या 87व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली.

माजी यष्टिरक्षक एमएसके प्रसाद यांची राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, जतीन परांजपे, सरनदीप सिंग, गगन खोडा, देवांग गांधी हे निवड समितीमधील अन्य सदस्य आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत अजय शिर्के यांची बीसीसीआयच्या सचिवपदी पुनर्निवड करण्यात आली आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या जतीन परांजपे यांनी चार एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच 62 प्रथमश्रेणी सामन्यांत त्यांनी 46.09 च्या सरासरीने 3964 धावा फटकावल्या. भारताचे माजी कसोटीपटू आणि मुंबईचे ज्येष्ठ क्रिकेटपटू असलेले वासू परांजपे हे जतीन परांजपे यांचे वडील आहेत.

Loading Comments