जेजे मेमोरिअल सेलिंग स्पर्धेचा थरार

 Mumbai
जेजे मेमोरिअल सेलिंग स्पर्धेचा थरार
Mumbai  -  

मुंबई - मुंबईच्या सागरी किनाऱ्यांनी रविवारी सेलिंग स्पर्धेचा थरार अनुभवला. मुंबई ते मांडवा आणि पुन्हा मांडवा ते मुंबई परत अशा मार्गावर जेजे मेमोरियल स्पर्धा भरवण्यात आली होती. सीबर्ड आणि सीबर्डच्याच श्रेणीतली जे 24 अशा दोन प्रकारच्या बोटींचा यात सहभाग होता. सीबर्ड श्रेणीत एकूण 10 बोट्स आणि 40 स्पर्धकांमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली. कॅप्टन सूरज सिंग आणि त्याच्या टीमने जबरदस्त जिद्दीच्या जोरावर विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. सूरजच्या टीममध्ये कौस्तुभ खाडे, दिपेश नेरपगारे आणि निखिल खरे यांचा समावेश होता.

तर जे 24 श्रेणीतील स्पर्धेमध्ये नाडर मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघानं जेतेपद पटकावलं. मॉर्गनला त्याच्या टीममधील विराफ हिरजी, राकेश वराडकर आणि नताशा बनजी यांनी उत्तम साथ दिली.

गेल्या दोन दिवसांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. तसेच समुद्रातही मोठ्या लाटा उसळत होत्या. या कठिण परिस्थितीचा सामना यावेळी स्पर्धकांना करावा लागला. जहांगीर जहांगीर यांनी १९८६मध्ये सर्वप्रथम मुंबई ते मस्केट हा लांब पल्ला सीबर्ड श्रेणीतल्या बोटीने पार केला होता. त्यानिमित्ताने जेजे मेमोरियल ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते.

Loading Comments