Advertisement

ज्युनियर मुंबई श्री शरीससौष्ठव स्पर्धेचा थरार बुधवारी


ज्युनियर मुंबई श्री शरीससौष्ठव स्पर्धेचा थरार बुधवारी
SHARES

अापल्या पीळदार स्नायूंचे प्रदर्शन दाखविण्यासाठी मुंबईचे युवा अाणि नवोदित शरीरसौष्ठवपटू व्यायामशाळेत तासनतास घाम गाळत असतात. अाता त्यांच्यासाठी पर्वणी असलेल्या ज्युनियर मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार दादरमध्ये रंगणार अाहे. ग्रेटर बाॅम्बे बाॅडीबिल्डिंग असोसिएशन अाणि मुंबई सबर्बन बाॅडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या विद्यमाने बुधवारी ज्युनियर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसह दिव्यांग तसेच मास्टर्स श्री अाणि पुरुषांची नवोदित मुंबई फिटनेस फिजिक स्पर्धा रंगणार अाहे. बुधवारी संध्याकाळी ४ वाजता दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमासमोर असलेल्या शिवाजी मंदिरमध्ये पीळदार स्नायूंचा दम घुमणार अाहे.


किताब विजेत्याला ११ हजारांचे इनाम

सहा वजनी गटात खेळविण्यात येणाऱ्या ज्युनियर मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब पटकावणाऱ्यास ११ हजार रुपयांचे पारितोषिक अाणि अाकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार अाहे. त्याचबरोबर गटात विजयी ठरणाऱ्या १ ते ५ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २५००, २ हजार, १५०० अाणि १ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल. ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो अाणि ७५ किलोवरील अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार अाहे.


मास्टर्स श्री, दिव्यांग मुंबई श्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद

खुल्या गटात होणाऱ्या दिव्यांग मुंबई श्री स्पर्धेतील १ ते ५ क्रमांकाच्या विजेत्यांना ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार अाणि १ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल. ४० ते ५० वयोगटात खेळवली जाणारी मास्टर्स मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ७० किलो अाणि ७० किलोवरील या दोन वजनी गटांत होणार अाहे. तसेच खुल्या गटात होणाऱ्या नवोदित मुंबई श्री मेन्स फिटनेस फिजिक स्पर्धेतील १ ते ५ क्रमांकाच्या विजेत्यांना ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार अाणि १ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा