प्रतीक्षानगर - गरीब शाळकरी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जस्ट फॉर किक ही संस्था फुटबॉल या खेळाचं मोफत प्रशिक्षण देते. त्याप्रमाणे प्रतीक्षानगर येथील अशोक पिसाळ या मैदानात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 18 नोव्हेंबरपासून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. असं तर वर्षाचे १२ ही महिने मुलांचे प्रशिक्षण सुरू ठेवलं जातं, पण हिवाळ्यात फुटबॉलचं प्रशिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांची आणखी चांगली कसरत होईल, असं प्रशिक्षक रॉयस्टन टिक्सऐरा यांनी सांगितलं.