साई प्रेरणा क्रीडा मंडळाला विजेतेपद

 Andheri
साई प्रेरणा क्रीडा मंडळाला विजेतेपद
साई प्रेरणा क्रीडा मंडळाला विजेतेपद
साई प्रेरणा क्रीडा मंडळाला विजेतेपद
साई प्रेरणा क्रीडा मंडळाला विजेतेपद
साई प्रेरणा क्रीडा मंडळाला विजेतेपद
See all
Andheri, Mumbai  -  

मालपा डोंगरी - वॉर्ड क्रमांक 81 मधील मालपा डोंगरी 3 येथे आयोजित भाजपा उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष चषक भव्य कबड्डी स्पर्धेत साई प्रेरणा क्रीडा मंडळानं विजय मिळवला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कबड्डी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. २४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या कबड्डी महोत्सवात १२ संघांचा समावेश होता.

१४-१२ अशा गुणफरकानं साई प्रेरणा क्रीड़ा मंडळ (खार) हे अंतिम विजयी झाले, तर जय हनुमान क्रीड़ा मंडळ (अंधेरी) उपविजेते ठरले. या कार्यक्रमात अंतिम सामन्यात भाजपा मुंबईचे सरचिटणीस सुमंत घैसास, जगत गौतम (मंडल महामंत्री), सुरेंद्र दुबे (माजी नगरसेवक), शेखर तावडे (वॉर्ड अध्यक्ष), कमलाकर कदम (कोकण आघाडी अध्यक्ष), वॉर्ड महामंत्री अविनाश भागवत तसंच भाजपाचे अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.

Loading Comments