कबड्डी, कबड्डी, कबड्डी

 Kurar Village
कबड्डी, कबड्डी, कबड्डी

मालाड - कुरारगाव परिसरातल्या आनंदवाडी इथं सुरेश गुप्ता कंपाउंडमध्ये जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत 6 ते 10 यावेळेत ही कबड्डी स्पर्धा खेळली जाणाराय. या कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कम्बोज आणि अंधेरीचे आमदार अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. अथर्व ग्रुप प्रतिष्ठाननं या स्पर्धेचं आयोजन केलंय.

अथर्व चषक 2016 आयोजित कबड्डी स्पर्धेचे यंदाचे नववं वर्ष आहे, प्रमुख आयोजक संकेत नलावडे यांनी ही माहिती दिली. या स्पर्धेत 12 पुरुष संघ व 8 महिला संघ सहभागी होणारायेत. सर्व सहभागी खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणाराय, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक आणि वॉर्ड क्रमांक 37च्या भाजपा अध्यक्षा सुचित्रा नाईक यांनी दिली.

Loading Comments