Advertisement

पिकलबॉल स्पर्धेत कादंबरी पाटीलची चमकदार कामगिरी


पिकलबॉल स्पर्धेत कादंबरी पाटीलची चमकदार कामगिरी
SHARES

पाचव्या मुंबई जिल्हा पिकलबॉल स्पर्धेत कादंबरी पाटीलने आपली चमकदार कामगिरी करत महिला दुहेरी फेरीत, तसेच मिश्र दुहेरी फेरीत सुवर्ण पदकाची कमाई करत विजय मिळवला. तर महिला एकेरी गटात भाग्यश्री भंडारीने सुवर्ण पदक आणि मिश्र दुहेरीमध्ये रौप्य पदक मिळवत आपला ठसा उमटवला. ही स्पर्धा ठाण्याच्या सुलोचना देवी सिंघानिया शाळेत खेळवण्यात आली.

मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटातील दुहेरी फेरीत मनीष राव आणि भूषण पोतनीस या जोडीने आपला दबदबा कायम राखला, तर एकेरी फेरीत आतंरराष्ट्रीय खेळाडू अतुल एडवर्डने सुंदर असा खेळ करत अपेक्षित बाजी मारत विजय मिळवला. अतुलने प्रतिस्पर्धी असलेल्या आशिष महाजनला ११-८, ६-११, २-११ अशा गुणसंख्येने पराभवाची धूळ चारली.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महिला दुहेरी गटात कादंबरी आणि अंकिता बालेकर या जोडीने अश्विनी राव, तनया राव या आई-मुलीवर ११-१, ११-८ अशा फराकाने मात केली. तर कादंबरीने मिश्र दुहेरीत देखील जोडीदार कृष्णा केसरकरसोबत खेळताना प्रतिस्पर्धी असलेल्या भाग्यश्री भंडारी आणि जयेश सूर्याजी या दोघांना तीन सेटमधील चुरशीच्या सामन्यात ११-८, ७-११, ११-२ अशा फरकाने हरवत विजय मिळवला. महिला एकेरीत भाग्यश्रीने स्वप्नाली आंग्रेला एकही संधी न देता सरळ दोन सेटमध्ये ११-०, ११-८ अशा गुणसंख्येने नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर परुष एकेरीत अतुलने सुवर्ण पदकावर कब्जा केला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा