खेता राम बनला भारतीय मॅरेथॉन विजेता


SHARE

मुंबई - मुंबईत झालेल्या 14 व्या मॅरेथॉनच्या मुख्य मॅरेथॉन स्पर्धेत खेता राम याने बाजी मारलीय. त्याने 2.19.51 सेकंदमध्ये मॅरेथॉनचं अंतर पूर्ण केलं. तर, बहादूर सिंह धोनीने दुसरा क्रमांक पटकावत 2.19.57 सेकंदमध्ये अंतर पूर्ण केलं. तर, टी.एच.संजीत याने तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये मोनिका अत्रेने पहिला क्रमांक पटकावला. मिनाक्षी पाटीलने दुसरा आणि अनुराधा सिंहने 1.25.20 सेकंद धावून तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये जी.लक्ष्मणने पहिला क्रमांक पटकावला. तर सचिन पाटील याने 1.06.22 सेकंद धावून दुसरा क्रमांक पटकावला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या