Advertisement

फेडरेशन कपसाठी महाराष्ट्र संघात मुंबईकर श्रेयस राऊळ, मधुरा पेडणेकर यांची निवड


फेडरेशन कपसाठी महाराष्ट्र संघात मुंबईकर श्रेयस राऊळ, मधुरा पेडणेकर यांची निवड
SHARES

हैदराबादमधील तेलंगणा येथे होणाऱ्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष अाणि महिला संघाची घोषणा नुकतीच करण्यात अाली. महाराष्ट्राच्या संघात श्रेयस राऊळ अाणि मधुरा पेडणेकर या मुंबईकर खो-खोपटूंनी अनुक्रमे पुरुष अाणि महिला संघात स्थान पटकावलं अाहे. 


आणखी कुणाचा समावेश?

यासोबत पुरुष संघात मुंबई उपनगरच्या अनिकेत पोटे, हर्षद हातणकर अाणि अक्षय भांगरे यांनी, तर ठाण्याच्या महेश शिंदे अाणि गजाजन शेंगाळने स्थान पटकावलं अाहे. पुरुष संघाला मुंबईच्या निलेश परब यांचं मार्गदर्शन लाभणार अाहे. महिला संघात ठाण्याच्या प्रियांका भोपी, कविता घाणेकर अाणि शितल भोर यांचा समावेश अाहे.


प्रत्येकी ८ संघांचा समावेश

राष्ट्रीय अजिंक्यपद फेडरेशन चषक स्पर्धेत देशातून प्रत्येकी ८ पुरुष अाणि महिला संघ सहभागी होणार अाहेत. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी या स्पर्धेत गेल्या ३ वर्षांपासून जेतेपदाचा मान पटकावला अाहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा