Advertisement

भांडुपमधे प्रथमच मॅटवरील खो-खो


भांडुपमधे प्रथमच मॅटवरील खो-खो
SHARES

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा भांडुपच्या कोकणनगरमधील मिनाताई ठाकरे मैदान येथे होणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन 20 एप्रिलला संध्याकाळी होईल. महापौर चषकाच्या निमित्ताने भांडुप नगरीत पहिल्यांदाच मॅटवर खो-खो सामने खेळवण्यात येणार असून त्याकरता मॅटची दोन क्रीडांगणे बनवण्यात येत आहेत. निमंत्रितांच्या या स्पर्धेत पुरूष, महिला आणि व्यावसायिक गटाच्या तब्बल 32 संघाचे 448 खेळाडू आणि मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सामने प्रमुख्याने संध्याकाळी विद्युत प्रकाश झोतात 23 एप्रिलपर्यंत खेळवण्यात येतील. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी भांडुपकरांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर खो-खो संघटनेचे कार्यवाह प्रशांत पाटणकर यांनी दिली. गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत विजेतेपदाचा मान पुरुष गटात महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने, तर महिला गटात शिवनेरी क्रीडा मंडळ आणि व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वेने पटकावला होता.

स्पर्धेतील सहभागी संघ खालील प्रमाणे

व्यावसायिक (पुरूष) गट - पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका, महावितरण, बॅंक आॅफ इंडिया, माझगाव डॉक, डी. डी. अॅडव्हर्टायझिंग, नेवल डॉक.

पुरूष गट - महात्मा गांधी स्पो. अकादमी, प्रबोधन क्रीडा भवन, श्री.सह्याद्री संघ, यूबी स्पोर्टस् क्लब, संघर्ष क्रीडा मंडळ, समता क्रीडा भवन, ओम युवा स्पोर्टस् क्लब, पराग स्पोर्टस् क्लब, स्वराज्य स्पोर्टस् क्लब, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, सरस्वती स्पोर्टस् क्लब, श्री. समर्थ व्यायाम मंदिर, अमरहिंद क्रीडा मंडळ, विद्यार्थी क्रीडा मंडळ, विजय क्लब , युवक स्पोर्टस् क्लब.

महिला गट - शिवनेरी क्रीडा मंडळ, महात्मा गांधी स्पो. अकादमी, परांजपे स्पोर्टस् क्लब, जिजामाता क्रीडा मंडळ, ओम युवा स्पोर्टस् क्लब, श्री. समर्थ व्यायाममंदिर, अमरहिंद क्रीडा मंडळ, सरस्वती स्पोर्टस् क्लब.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा