• लहाग्यांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
  • लहाग्यांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
  • लहाग्यांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
SHARE

घाटकोपर - लहाग्यांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार सोहळा शिवाजी शिक्षण संस्थेच्या आवारात झाला. शिवाजी शिक्षण संस्था, पूर्व प्राथमिक विभाग सेमी इंग्रजी शाळेत ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. धावणीच्या स्पर्धेत नर्सरीमधील सिद्धांत मोरे आणि तेजस्वीनी वळवी, छोटाशिशु ‘अ’ यातून प्रशांत अडसल आणि श्रृती शेटगे आणि छोटा शिशु ‘ब’ मध्ये नील चव्हाण आणि सिद्धी चव्हाण यांना प्रथम आल्याबद्दल चषक देण्यात आलं. बेडूक उडीत नर्सरीतील निर्भय पावसकर, भुमी पाटेकर या प्रथम चषक मिळाले. तर छोटाशिशु ‘अ’ आणि ‘ब’ यात तनिष ठोंबरे, वैभवी परब, देवांशु देशमुख आणि शिवानी महाडिक यांना चषक देण्यात आले. मुलांच्या बादलीत बॉल टाकणे या स्पर्धेत आर्थन खैरे आणि आर्या हेगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. चेंडूने बाटल्या पाडणे यात क्रिश कांबळे, सोनाक्षी आंबोरे यांना चषक मिळालं. या सर्व विद्यार्थ्यांना माजी शिक्षिका सुजाता फणसेकर, शिवाजी शिक्षण संस्थेतील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनाली परब आणि भालेराव मॅडम यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी झालेल्यांना चषक देऊन गौरव करण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या