टॉप स्पिनर, किंग पाँग संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

 Worli
टॉप स्पिनर, किंग पाँग संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

टॉप स्पिनर आणि किंग पाँग संघाच्या अनुक्रमे दिव्या महाजन आणि प्रिती भोसले या दोघींनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत आपल्या संघास विजयी करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. इलेव्हन स्पोर्टस् प्रायव्हेट लि. ने आयोजित केलेल्या कॅपिटल फर्स्ट मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेत किंग पाँग आणि टॉप्स स्पिनर संघाने दमदार कामगिरी केली. ही स्पर्धा रविवारी वरळीच्या एनएससीआय येथे झाली.

यावेळी टॉप स्पिनर विरुद्ध हायटाईटमध्ये झालेल्या सामन्यात 5-2 अशा फरकाने मात करत टॉप स्पिनरने विजय संपादित केला. किंग पाँग विरूद्ध ब्लॅझिंग बॅशर्समध्ये 5-1 अशा मोठ्या फरकाने ब्लॅझिंग बॅशर्सला नमवत किंग पाँगने विजय मिळवला. या स्पर्धेत चॅम्पियन कोण ठरेल हे आता अंतिम सामन्यातच कळेल.

दिव्या महाजनने महिलांच्या एकेरी सामन्यात हायटाईड संघाच्या सेन्होरा डिसोझाला 11-8, 11-8, 11-8 अशा फरकाने पराभूत केले. नंतर दिव्याने आपला जोडीदार निशांत कुलकर्णीसोबत मिश्र दुहेरी स्पर्धेत हायटाईडच्या शुभम आंब्रे आणि सेन्होरा डिसोझा यांना 12-10, 11-6, 11-3 अशा गुणसंख्येने विजय मिळवून दिला. किंग पाँगच्या मुदित दानी आणि प्रिती भोसले यांनी मिश्र दुहेरीच्या लढतीत नोएल पिंटो आणि श्वेता पार्टे यांना 11-9, 11-9, 11-9 असे पराभूत केले.

Loading Comments