• दादर खोपोली सायकल शर्यतीत किरण बंडगर, प्रकाश अोळकर ठरले विजयी
SHARE

74 किलोमीटर अंतराच्या दादर-खोपोली सायकल शर्यतीत पुरुषांच्या एलिट गटात सांगलीच्या किरण बंडगरने विजेतेपद पटकावले तर एमटीबी प्रकारात प्रकाश अोळेकर विजेता ठरला. दादरच्या वा.श. मठकर मार्गावरून सुरू झालेल्या या सायकल शर्यतीला राज्यातील प्रमुख सायकलपटूंचा चांगला प्रतिसाद लाभला. खुल्या आणि एमटीबी व हायब्रीड अशा दोन गटांमध्ये रंगलेल्या या शर्यतीत राज्यातील दीडशेपेक्षा जास्त सायकलपटू सहभागी झाले होते.मुंबईचा धीरेन बोन्त्रा दुसऱ्या स्थानी

41 किलोमीटरपर्यंत सर्व सायकलपटू एका जथ्याने अागेकूच करत होते. तीन सायकलपटूंनी एका समूहात अंतिम रेषा पार केली. पण किरण बंडगर पहिल्या स्थानावर अाला तर मुंबई शहरच्या धीरेन बोन्त्रा याने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. मुंबईचाच मेहेर्झाद इराणी तिसरा अाला. विजेत्याला 15 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात अाले तर एमटीबी प्रकारात विजेत्या ठरलेल्या प्रकाशला 10 हजार रुपयांचे इनाम देऊन गौरवण्यात अाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या