Advertisement

तेजस्विनी सावंतचा सुवर्ण लक्ष्यभेद


तेजस्विनी सावंतचा सुवर्ण लक्ष्यभेद
SHARES

कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत अाणखी एका पदकाची भर घातली. गुरुवारी रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या तेजस्विनी सावंतने शुक्रवारी ती कसर भरून काढत पहिल्या शाॅटपासूनच अंतिम लढतीवर वर्चस्व गाजवलं अाणि महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात सुवर्णपदकावर लक्ष्यभेद केला.


राष्ट्रकुलमध्ये स्पर्धाविक्रम

अंतिम फेरीत पहिल्या शाॅटपासूनच तेजस्विनीने अाघाडी घेतली. ती अखेरपर्यंत टिकवत ४५७.९ गुणांसह स्पर्धाविक्रमाची नोंद करून सुवर्णपदकावर कब्जा केला. ३७ वर्षीय तेजस्विनीने निलिंगमध्ये १५२.४ तर प्रोन पोझिशनमध्ये १५७.१ गुणांची कमाई केली होती. यापूर्वी सिंगापूरच्या जास्मिन सेर झियांग वेई हिने २०१४च्या ग्लास्गो स्पर्धेत ४४९.१ गुणांसह स्पर्धाविक्रम रचला होता.


अंजूम मोडगील हिला रौप्य

याच प्रकारात भारताच्या अंजूम मोडगील हिने स्पर्धाविक्रम मोडीत काढला तरी तिला ४५५.७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने निलिंगमध्ये १५१.९ अाणि प्रोनमध्ये १५७.१ गुण मिळवले होते. स्काॅटलंडच्या सोनेड मॅकइंटोशने ४४४.६ गुणांसह कांस्यपदक पटकावले.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये कोल्हापूरचा दबदबा, राहुल अावारेला सुवर्ण तर तेजस्विनी सावंतला रौप्य

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा