Advertisement

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाले मानाचे पुरस्कार

राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या २०१८-१९ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाले मानाचे पुरस्कार
SHARES

राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या २०१८-१९ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची (Shiv Chhatrapati State Sports Award) घोषणा करण्यात आली आहे. यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ (Pandarinath) तथा आण्णासाहेब पठारे (Anna Saheb Pathare) यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. तर ५ जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

युवराज खटके, सांगली (अॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती), नितीन खत्री, पुणे (तायक्योंदो), जगदीश नानजकर, पुणे (खो-खो), अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा अॅथलेटिक्स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जाणार आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची (खेळाडू गट) यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कबड्डी खेळात पुरुष गटातून रिशांक देवाडिगा आणि गिरीष इरनक तर महिला गटातून सोनाली शिंगटे हिला पुरस्कार जाहीर झाला आहे. कुस्ती खेळासाठीचा राज्य क्रीडा पुरस्कार अभिजित कटके याला दिला जाणार (State sports awards) आहे.

त्याशिवाय साहसी गटात चौघांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. यात खाडी पोहणे यासाठी प्रभात कोळी आणि शुभम वनमाली यांना पुरस्कार दिला जाणार आहे. तर गिर्यारोहणासाठी अपर्णा प्रभूदेसाई आणि सागर बडवे यांना राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


तर स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) या तिघांना दिव्यांग खेळाडू गटातील राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर जयदीपकुमार सिंह याला ज्युदो आणि वैष्णवी सुतार हिला टेबल टेनिस खेळासाठी पुरस्कार दिला जाणार (State sports awards) आहे.

राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. २०१८-१९ यावर्षासाठीचे हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचं वितरण शनिवार २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गेटवे ऑफ इंडिया इथं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत.हेही वाचा -

सरकता जिना फिरला उलट्या दिशेनं; प्रवासी जखमी

एलबीएस मार्ग होणार १०० फुटांचा, ७९ बांधकामं पाडलीRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा