Advertisement

एलबीएस मार्ग होणार १०० फुटांचा, ७९ बांधकामं पाडली

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अतिक्रमणांमुळे (encroachment) एलबीएस (Lal Bahadur Shastri Marg) रोडच्या रस्तारुंदीकरणात अडथळा आला होता.

एलबीएस मार्ग होणार १०० फुटांचा, ७९ बांधकामं पाडली
SHARES

 पूर्व उपनगर व शहर यांच्या दरम्यानचा लालबहादूर शास्त्री मार्ग (Lal Bahadur Shastri Marg -एलबीएस) हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा मार्ग १०० फूट करण्यात येणार आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अतिक्रमणांमुळे (encroachment) एलबीएस रोडच्या रस्तारुंदीकरणात अडथळा आला होता. मागील आठवड्यात एलबीएस रोडवरील ६१ बांधकामं तोडण्यात आली होती.  तर आता मंगळवारी या ठिकाणी ७९ पात्र व्यावसायिक बांधकामे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) तोडली आहेत. 

बांधकामं तोडताना स्थानिकांकडून मोठा विरोध होत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एलबीएस रोड (Lal Bahadur Shastri Marg) वरील गोपाळ भवन ते श्रेयस जंक्शनदरम्यानच्या ८२० फूट लांबीच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना  ७९ बांधकामे होती. त्यामुळे या ठिकाणी आणि लगतच्या परिसरात अनेकदा वाहतूककोंडी होत असे. वाहतूक कोंडी (traffic) होऊ नये म्हणून बांधकामे हटवून हा रस्ता १०० फूट करण्यात येणार आहे. मात्र, या बांधकामांमुळे हा रस्ता १०० फूट करण्याचं रखडलं होतं. मंगळवारी कारवाई करून ही बांधकामं तोडण्यात आली. 

कारवाईनंतर लगेचच रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारवाईसाठी ४१ पोलीस तैनात होते. तर महापालिकेचे ७५ कामगार, कर्मचारी, अधिकारीदेखील या कारवाईसाठी कार्यरत होते. या कारवाईमुळे एलबीएस मार्गाच्या (Lal Bahadur Shastri Marg) दोन्ही बाजूंना प्रत्येकी २३ फूट, यानुसार रस्त्याची रुंदी ४६ फुटांपर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. आठ दिवसांपूर्वी पोलीस बंदोबस्तात पालिकने येथील ६१ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. एकाच वेळी नऊ जेसीबींद्वारे या ठिकाणी कारवाई करण्यात आली.  



हेही वाचा -

देवनार कचराभूमीवर होणार वीजनिर्मिती, स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी बँकेएेवजी पोस्टात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा