Advertisement

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या अार्यन वेर्णेकरचा राष्ट्रीय विक्रम


राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या अार्यन वेर्णेकरचा राष्ट्रीय विक्रम
SHARES

महाराष्ट्राच्या आर्यन वेर्णेकरने पुण्यातील बालेवाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. शेराॅन साजू, रायना सालढाना अाणि नील राॅय यांनीही अापापल्या गटात सुरेख कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. वाॅटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानं कर्नाटकला १५-० असं हरवत अंतिम फेरीत मजल मारली.


३५व्या सबज्युनियर अाणि ४५व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अार्यन वेर्णेकर याने १४ वर्षांखालील मुलांच्या ५० मीटर बटरफ्लाय या प्रकारात २६.१३ सेकंद अशी वेळ नोंदवत नव्या विक्रमाला गवसणी घातली. अासामच्या विक्रम चांगमाई यानेही २६.४४ सेकंद अशी वेळ देत रौप्यपदक पटकावले.


शेराॅन साजूला सुवर्ण

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात, शेराॅन साजू हिने ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात ३४.७३ सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिला मध्य प्रदेशच्या अॅनी जैन हिने कडवी टक्कर दिली. मात्र अॅनीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.


हेही वाचा -

केदार जाधवला वेध पुनरागमनाचे!

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नील राॅयचा नवा विक्रम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा