Advertisement

माहिमच्या महाराजा चषक क्रिकेट स्पर्धेची धूम


माहिमच्या महाराजा चषक क्रिकेट स्पर्धेची धूम
SHARES

माहिम - महाराजा चषक 2017 ही क्रिकेट टुर्नामेंट 27 ते 29 जानेवारी दरम्यान पार पडली. यंदा या चषकाचे मानकरी मंगलमूर्ती इलेव्हन (वडाळा) हे ठरलेत. त्यांना 50 हजार रोख रक्कम आणि चषक देण्यात आले आहे. तर ओमकार मित्र मंडळने (माहिम) द्वितीय क्रमांक पटकावला. ओमकार मित्र मंडळाला 30 हजार रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह देण्यात आले. या वेळी खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी वाघिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजन पारकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती.

महाराजा चषक 2017 या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये 32 क्रिकेट संघ सहभागी झाले होते. गेली 6 वर्षे ही टुर्नामेंट निलेश घोसाळकर आणि निलेश सागवेकर यांच्या संकल्पनेतून भरवण्यात येते. यंदा मुंबई बाहेरचे 7 संघ सहभागी झाले होते. मुंबईसह रोहा, कल्याण, अंबरनाथ, पालघर, पनवेल या ठिकाणच्या खेळाडूंनीही उपस्थिती दर्शवली. नवप्रकाश तरूण मित्र मंडळाने या चषकचे आयोजन केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा