श्री. समर्थ व्यायाम मंदिरतर्फे 'पावसाळी मल्लखांब' शिबिराचे आयोजन


  • श्री. समर्थ व्यायाम मंदिरतर्फे 'पावसाळी मल्लखांब' शिबिराचे आयोजन
SHARE

शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरातर्फे 14 जून ते 21 जून 2017 या कालावधीत 33 व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत समर्थ व्यायाम मंदिराच्या पटांगणात, शिवाजी पार्क, दादर येथे हे शिबिर होणार आहे. यामध्ये 5 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकेल. यामध्ये वयोमर्यादा नसून पालक तसेच महिलांनाही या शिबिरात प्रवेश दिला जाईल. तसेच त्यांचा वेगळा वर्गही असेल. मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होत असतात.

या पावसाळी मल्लखांब शिबिरात सूर्यनमस्कार, मुक्तहस्त व्यायाम आणि योगासने याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना समर्थच्या नामवंत खेळाडू, तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 15 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी जगभरातील मल्लखांब प्रेमींनी मल्लखांबावर 10,00,000 साध्या उड्या करण्याचा उपक्रम करण्याचे ठरवले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या