Advertisement

पार्ल्यात जूनमध्ये रंगणार मॅरथॉन


पार्ल्यात जूनमध्ये रंगणार मॅरथॉन
SHARES

'किप ऑन रनिंग इंडिया' या ग्रुपतर्फे पार्ल्यात 25 जूनला मॅरथॉनचं आयोजन करण्यात आले आहे. या मॅरथॉन स्पर्धेचे आयोजन मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट अॅथलेटिक अससोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. 

किप ऑन रंनिंग इंडिया या ग्रुपचे हे दुसरे वर्ष आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा एकूण 10 कि.मी. ची असणार आहे. या मॅरथॉनमध्ये एनसीसी, एनएसएसचे 150 स्वयंसेवक आणि सदस्य स्पर्धकांच्या मदतीसाठी उपस्थित असणार आहेत. या मॅरथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना एक प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. हे प्रशस्तीपत्रक प्राप्त झालेल्या सर्वांना येत्या स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरथॉन 2018 मध्ये सहभागी होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या स्पर्धेचा रेसिंग ट्रॅक लवकरच संकेतस्थळावर पाहता येणार आहे. मॅरथॉनच्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून या वेळी 600 स्पर्धाकांची मर्यादा ठेवली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख ही 15 जून असणार आहे. अधिक माहिती  www.keeponrunningindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

आरोग्यदायक आयुष्य जगण्यासाठी धावण्यामुळे आपल्याला किती फायदा होतो आणि त्याचे फायदे काय आहेत, याची जागरुकता आम्ही किप ऑन रनिंग इंडिया या ग्रुपतर्फे करतो 

 राजेंद्र टेंबे, संस्थापक, किप ऑन रनिंग इंडिया ग्रुप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा