प्रतिक्षानगरमध्ये रंगणार मार्शल आर्टस् कराटे स्पर्धा

  Pratiksha Nagar
  प्रतिक्षानगरमध्ये रंगणार मार्शल आर्टस् कराटे स्पर्धा
  मुंबई  -  

  प्रतिक्षानगरमध्ये महाराष्ट्र दिना निमित्त 1 मे रोजी मार्शल आर्टस् कराटे स्पर्धा 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसंघ क्रीडा प्रतिष्ठान आणि कराटे ओशो अांतरराष्ट्रीय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा प्रतिक्षानगर येथील तांडेल कान्होजी आंग्रे उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल असून, नाव नोंदणी केलेल्या खेळाडूंना यात सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेमध्ये वयाची अट नसून, ही स्पर्धा सर्व वयोगटांत होणार आहे. विजेत्या स्पर्धकाला सन्मानचित्र आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने नवीन खेळाडू समोर येतील आणि खासकरून महिलांना यामध्ये प्राधान्य देण्यात आल्याचे सांगत स्वत:चा सेल्फ डिफेन्स कसा करता येईल हा आमचा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे कराटे ओशो आंतरराष्ट्रीयचे अध्यक्ष भरत अंदेवार यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.