Advertisement

अंधेरीत रंगणार सब-ज्युनियर, फेडरेशन कप कॅरम स्पर्धेचा थरार


अंधेरीत रंगणार सब-ज्युनियर, फेडरेशन कप कॅरम स्पर्धेचा थरार
SHARES

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे ४४वी सब ज्युनियर राष्ट्रीय अांतरराज्य कॅरम स्पर्धा अाणि २४वी अखिल भारतीय फेडरेशन कप कॅरम स्पर्धा अायोजित केली जाणार अाहे. दादर पश्चिम येथील हालरी विसा अोस्वाल समाज हाॅल येथे २ ते ५ जानेवारीदरम्यान हा थरार रंगणार अाहे. एमसीएने याअाधी २००३ मध्ये सिनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धा अायोजित केली होती.


२२ राज्यातील खेळाडूंचा सहभाग

देशभरातील २२ राज्यांमधून युवा कॅरमपटू कॅडेट मुले-मुली (१२ वर्षांखालील) अाणि सब ज्युनियर मुले-मुली (१४ वर्षांखालील) गटात विजेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांशी झुंजतील. पाच जागतिक विजेते अाणि ४० भारतीय स्टार खेळाडू हे या चारदिवसीय स्पर्धेचे मुख्य अाकर्षण ठरणार अाहे. फेडरेशन कपमध्ये २३ राज्यांमधील अाणि १२ संस्थांमधील खेळाडू विजेतेपदासाठी अापले कौशल्य सादर करतील.


असे असेल स्पर्धेचे स्वरूप

कॅडेट गटातील स्पर्धा ही फक्त एकेरी गटात खेळवली जाणार असून ती थेट बाद फेरीची असेल. सब ज्युनियर गटात सांघिक अजिंक्यपद स्पर्धा असून ती लीग अाणि बाद फेरीनुसार खेळवली जाईल. तसेच एकेरी गटातही ही स्पर्धा खेळवली जाईल. फेडरेशन कपमध्ये पुरुष अाणि महिला एकेरी व दुहेरीचे सामने बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. सर्व सामने हे सुर्को कॅरम बोर्डवर खेऴवले जातील.


बंगारू बाबू यांचा सत्कार

अाॅल इंडिया कॅरम फेडरेशनचे संस्थापक अाणि महासचिव तसेच अांतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सचिव बी. बंगारू बाू यांचा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे सत्कार केला जाणार अाहे. कॅरम हा खेळ देशात वाढविण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बंगारू बाबू यांना एमसीएतर्फे उद्धाटन सोहळ्याप्रसंगी १,११,१११ रुपयांचे बक्षिस दिले जाणार अाहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा