मित्सुई शोजी क्रिकेट 2 मे पासून

 Marine Drive
मित्सुई शोजी क्रिकेट 2 मे पासून

मित्सुई शोजी टी-20 क्रिकेट लीग स्पर्धाला 2 मे पासून, मरिन लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 मे रोजी होणारा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ज्वाला फाऊंडेशनचे संचालक आणि आयोजक ज्वाला सिंग, माजी रणजीपटू विनायक सामंत उपस्थित होते. विजेत्या संघाला 2 लाखांचे बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे.

मित्सुई शोजी टी-20 लीगमध्ये घाटकोपर जेंट्स, शिवाजी पार्क वॉरिर्यस, मुंबई पोलीस, सिटी रायडर्स, ठाणे मराठाज् आणि वांद्रे हिरोज असे पाच संघ असणार आहेत. यामध्ये माजी आतंराष्ट्रीय खेळाडू आणि रणजी खेळाडूंचा देखील समावेश असणार आहे. आतंरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये श्रीलंकेचे चमिंडा वास आणि जेहान मुबारक आणि माजी रणजीपटू या वसीम जाफर हे देखील यावेळी खेळणार आहेत.

Loading Comments