धोनीनं सोडलं वन डे, टी-20चं कर्णधारपद

  Pali Hill
  धोनीनं सोडलं वन डे, टी-20चं कर्णधारपद
  मुंबई  -  

  मुंबई - क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीनं भारतीय वन-डे आणि टी-20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. बीसीसीआयनं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरी तो टीम इंडियामध्ये खेळत राहणार आहे. इंग्लडविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी 6 जानेवारीला टीम इंडियाची निवड होणार आहे. धोनीच्या राजीनाम्यामुळे आता वन-डे मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कुणाकडे दिली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2014रोजी धोनीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. आता त्यानं वन डे आणि टी-20चं कर्णधारपदही असंच तडकाफडकी सोडलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.