आयपीएलमध्ये महालक्ष्मीचा शशांक सिंह

  Mumbai
  आयपीएलमध्ये महालक्ष्मीचा शशांक सिंह
  मुंबई  -  

  महालक्ष्मी - आयपीएलचा 10 वा सीझन पुढच्या महिन्यापासून सुरु होत आहे. या आयपीएलमध्ये महालक्ष्मीमध्ये राहणाऱ्या शशांक सिंहची निवड झाली आहे. आपयीएलमध्ये खेळून शशांक आपल्या क्रिकेट कारर्किदीची सुरुवात करत आहे. दिल्ली डेअरडेविल्सकडून शशांक खेळणार आहे. त्यामुळे शशांकने सध्या सरावाकडे विशेष लक्ष दिले आहे.

  प्रशिक्षक विद्या पराडकर त्याच्यावर सध्या विशेष मेहनत घेत आहेत. झहीर खान याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अँजेलो मैथ्युज, सैम बिलिंस, एल्बी मोर्कल, कोरी एंडरसन यांचा सहभाग आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससोबत खेळण्याची शशांकला संधी मिळाली आहे. दिल्ली संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.