मुंबई चॅलेंजरची पंजाबवर मात

 Mumbai
मुंबई चॅलेंजरची पंजाबवर मात
Mumbai  -  

मुंबई - युबीए उत्तरी क्षेत्रातील बेस्ट ऑफ थ्री सिरीजच्या सेमीफायनच्या पहिल्या सामन्यात मुंबई चॅलेंजर्सने पंजाबवर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये 43 गुण मिळवत मुंबईने पंजबाला 128-114 अशी धूळ चारली. यूबीए सीजन 4 चॅम्पियनशीप सिरीज 10 ते 16 मार्चदरम्यान पणजीच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर खेळवली जात आहे. पंजाबच्या रवी भारद्वाज, अकेलन परी, राजवीर, डर्मेन क्रॉकरेल आणि कौशन यांनी सामन्याला सुरुवात केली. तर गैरी गिल आजारी असल्याने त्याला मैदानाच्या बाहेर बसावं लागलं. पंजाबकडून करण्यात आलेल्या सुरुवातीच्या लाईनअपला मुंबई चॅलेंजरच्या जगदीप बैंस, एलेक्स स्केल्स, जिम्मी स्क्रॉग्निंस, निखिल आणि इंद्रजीत गिल यांनी तेवढ्याच ताकदीनं उत्तर दिलं. सुरुवातीला चांगली खेळी करणाऱ्या पंजाबला अखेर सावध पवित्रा घेऊन मुंबईने हरवत सामना खिशात घातला.

Loading Comments